लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात दि. १९, शुक्रवार रोजी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात मतदान होणार असून या लोकसभा मतदार संघासह देशातील एकूण १०२ आणि महाराष्ट्रातील ०५ लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.
उमेदवारीसाठी पक्षांतर्गत झालेल्या वड्डेट्टीवार विरुद्ध धानोरकर लढाईत प्रतिभाताई धानोरकरांनी सद्भावनेच्या लाटेवर आपण निवडून येणार असल्याचे चित्र पक्ष श्रेष्ठीसमोर रंगविले, उमेदवारी मिळवली. पण ही उमेदवारी प्रतिभा धानोरकरांच्या राजकीय कारकीर्दीसाठी श्राप ठरत असल्याचे चित्र संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यकाळात पहावयास मिळाले. ज्या सद्भावनेच्या लाटेच्या बळावळ धानोरकरांणी उमेदवारी मागितली आणि आपण त्यांना दिली, तशी कोणतीही सद्भावनेची लाट चंद्रपूर लोकसभा मतदार संघात नसल्याचे कॉँग्रेस आणि कॉँग्रेस प्रणित ‘मविआ’ आघाडीच्या नेत्यांना लक्षात आले.
त्यामुळे भाजप प्रणित ‘महायुती’ने उमेदवारी दिलेल्या सुधीर मूनगंटीवार यांनी या भागातील आमदार म्हणून, पालकमंत्री म्हणून, मंत्री म्हणून केलेल्या विकास कामांच्या बळावर प्रचारात घेतलेली आघाडी, मतदारांच्या मनात मिळविलेले स्थान लक्षात घेवून धानोरकरांच्या प्रचारावर वेळ खर्ची घालण्यापेक्षा जी ‘सीट’ निघणारी आहे, तिथे वेळ देण्याचा निर्णय कॉँग्रेसच्या, ‘मविआ’च्या, ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी घेतला असल्याचे कळते. परिणामी धानोरकरांच्या प्रचाराकडे कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी, कॉँग्रेस नेते राहुल गांधी, स्वत:च्या पक्षात प्राण ठेवू न शकलेले, पण ‘इंडिया’ आघाडीत प्राण फुकण्यासाठी देश पिंजून काढण्याची भाषा करणारे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सर्वांनी पाठ फिरवील्याचे पहावयास मिळाले.
ज्या सद्भावनेच्या बाता सुरू होत्या, त्या सद्भावनेप्रती भावना दाखविण्यासाठी ही एक स्त्री म्हणून सुद्धा सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी किंवा किमान ‘मविआ’च्या एक प्रमुख नेत्या म्हणून राज्यभर मिरवणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी तरी प्रतिभा धानोरकरांच्या विजयासाठी या लोकसभा मतदार संघाचा दौरा करणे, एखादी सभा नाहीतर नाही प्रचार रॅली काढणे किंवा किमान एखादी कॉर्नर सभा किंवा किमान एखादी कॉर्नर बैठक घेणे अपेक्षीत होते. पण असे घडले नाही.
एकीकडे सुधीर मूनगंटीवार यांच्या प्रचारासाठी, विजयासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षा पासून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावणकुळे, चित्रा वाघ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत प्रत्येकजण मूनगंटीवारांची काळजी वाहत असतांना प्रतिभा धानोरकरांना कॉँग्रेस नेत्यांनी, ‘मविआ’ नेत्यांनी गेलेली ‘सीट’ म्हणून वाऱ्यावर सोडून देणे प्रतिभा धानोरकरांच्या मनावर आघात करणारे ठरले. त्यांचे राजकीय भविष्य उद्ध्वस्त करणारे ठरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काल सायंकाळपासून प्रचार तोफा थंडावल्यानंतर सांख्यिकी राजकीय खेळीत ही सुधीर मूनगंटीवारांनी चांगलीच आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. यासाठी त्यांनी त्यांच्याबाजूने विविध जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची उभी केलेली फळी [पॉलिटिकल स्लिपर सेल] या निवडणुकीत टप्यात दिसून येत असलेला त्यांचा विजय पदरात पाडून घेण्यासाठी चांगलीच सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे.
तर सद्भावनेच्या तथाकथित लाटेवर निवडून येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रतिभा धानोरकर याबाबतीतही मतदारांनी नाकारलेल्या जातीय राजकारणाच्या मनसुब्यावरच मनात मांडे मांडत असल्याचे पहावयास मिळत आहे. एकूणच उमेदवारी भेटण्यापासून ते मतदानापर्यंतचा धानोरकरांचा निवडणूक प्रचाररूपी राजकीय प्रवास म्हणजे, मनात मांडे….पदरात धोंडे…असा दिसून येत आहे….!
ब्रह्मानंद चक्करवार…. 🖋️