Monday, December 23, 2024
Homeलेखमेकडाचा मोती करून खेळत बसला कॉँग्रेसचा उमेदवार

मेकडाचा मोती करून खेळत बसला कॉँग्रेसचा उमेदवार

विकास कामांचे प्रमाण देत, शब्द देत महायुतीच्या मूनगंटीवारांनी जिंकली मतदारांची मने

देशात २०१४ पासून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने विरोधी पक्षांकडे विरोधात बोलण्यासाठी काही मुद्देच दिले नाही, ठेवले नाहीत. त्यामुळेच आपण पाहतो की, कॉँग्रेस असो अथवा कॉँग्रेस प्रणित संपूर्ण ‘इंडिया’ नामक आघाडी असो फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध गरळ ओकण्याच्या, त्यांना तुच्छ लेखण्याच्या….कलम ३७०, सीएए, राममंदिर, डोकलाम सारख्या विषयात राष्ट्रविरोधी भूमिका घेत विशिष्ट धर्मियांचे लांगूनचालण करण्याच्या, जातीपातीच्या राजकारण केंद्रित प्रचारात अडकून पडली असल्याचे दिसून येत आहे…!

कॉँग्रेस प्रचाराचे देशस्तरावर जे सूत्र दिसून येत आहे, तेच सूत्र चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात दिसून येत असून या लोकसभा मतदार संघातील कॉँग्रेस प्रणित ‘इंडिया’ आघाडीचा उमेदवार ही विकासाच्या विषयावर न बोलता फक्त आणि फक्त अफवा तंत्राचा वापर करत जातीपातीच्या राजकारण केंद्रित अपप्रचारावर भर देतांना दिसून येत आहे. यासाठी भाजप प्रणित ‘महायुती’ चे उमेदवार सुधीर मूनगंटीवार यांच्या भाषणातील काही वाक्यांची ‘क्लिप’ समाज माध्यमांवर सामायिक करून मतदारांच्या मनात विषाची पेरणी करणे, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा-कुणबी समाजात देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध निर्माण झालेल्या कथित नाराजीचा फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे, या लोकसभा मतदार संघातील शेकडो रोजमजूर, गोर-गरीब कुटुंबियांच्या दृष्टीने वरदान ठरलेल्या दारूबंदी निर्णयाविरुद्ध बोलणे, केवळ याच नव्हेतर राज्यभरातील बांबू उत्पादकांसाठी हिताच्या ठरलेल्या बांबू प्रकल्पाविषयी बेच्छूट आरोप करणे, व्यक्तिगत चरित्रहणण करण्याचा कुप्रयास करणे या मुद्यांचा वापर कॉँग्रेस प्रणित ‘इंडिया’ आघाडी च्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून करण्यात येत आहे.

एकीकडे भाजप प्रणित ‘महायुतीचे’ उमेदवार सुधीर मूनगंटीवार एक-दोन नव्हेतर शेकडो विकास कामांचे दाखले देत, प्रमाण देत मतदार संघाच्या विकासासाठी मतदारांसमोर आपले विकासाचे व्हीजन सादर करत मतदारांची मने जिंकत असतांना कॉँग्रेस प्रणित ‘इंडिया’ आघाडी च्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांचा हा ‘खोट बोल पण रेटून बोल….’ स्वरूप जातीपातीचे राजकारण केंद्रित अपप्रचार म्हणजे मेकडाचा मोती करून खेळत बसण्याचाच प्रकार होय, अशी चर्चा चंद्रपूर लोकसभा मतदार संघात रंगलेली पहावयास मिळत आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या एका विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुधीर मूनगंटीवार यांची ओळख केवळ चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघालाच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्राला आपला माणूस म्हणून, विकास पुरुष म्हणून आहे…राज्याचे अर्थमंत्री म्हणून, वन मंत्री म्हणून, सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय, केलेले कार्य त्यांच्यातील एका आदर्श, दूरदृष्टी राजकारण्याचे प्रमाण देणारे निर्णय आहेत, कार्य आहेत. आपल्या राज्याच्या संस्कृती विषयी, देशाच्या अस्मितेविषयी त्यांना कोणी काही शिकविण्याची, प्रश्न करण्याची गरजच नाही. राज्याच्या, देशाच्या अस्मितेचा विषय असलेल्या आणि राष्ट्रविरोधी शक्तींना, हिंदू विरोधी शक्तींना कसे संपवितात याचे प्रतीक असलेले छत्रपती शिवरायांचे वाघनखं देशात परत आणणारा वाघ आहे तो….कोणत्याही शासकीय कार्यालयाने त्या कार्यालयात आलेला ‘कॉल’ उचलताच ‘हॅलो’ म्हणण्याऐवजी आपल्या संस्कृतीचे, धर्माचे बोल असलेले, राष्ट्राभिमान जागृत ठेवणारे ‘वंदे मातरम’ म्हणावे…असा निर्णय घेणारा, शासन आदेश काढणारा राष्ट्राभिमान आहे तो….!

त्यामुळे भाजप प्रणित ‘महायुती’च्या सुधीर मूनगंटीवार यांच्या विरुद्ध कॉँग्रेस प्रणित ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवाराकडून जातीपातीच्या, बेच्छूट आरोपांच्या, खोट बोल पण रेटून बोल अशा अपप्रचाराच्या कुबड्या घेवून सुरू असलेल्या अस्तित्वहीन राजकारणाला पोकळ अस्मितेच्या भावनेची जोड देवून मूनगंटीवारांविरुद्ध अस्मितेची लाट निर्माण करण्याचा जो निरर्थक प्रयोग सुरू आहे, तो ही लाट न ठरता वाऱ्यावरची वरातच ठरणार आहे….! 

एकूणच शेकडो विकास कामे करत, कॉँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या टक्केवारीच्या राजकारणाची दडपशाही झुगारून लावत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या लोकसभा मतदार संघाच्या, राज्याच्या विकासासाठी स्वत:ला वाहून घेत विकासपुरुष म्हणून महाराष्ट्राला ज्ञात असलेल्या, आपल्या मतदार संघातील इंगळे नामक कुटुंबातील कुटुंब प्रमुखाच्या ‘बायपास सर्जरी’साठी शासन मदतीस उशीर लागणार आहे; हे लक्षात घेवून स्वत: साडेचार लाख रुपये देत मतदारसंघाचा फक्त लोकप्रतिनिधी नव्हेतर कुटुंबप्रमुख असल्याचे प्रमाण देणाऱ्या, ‘कोरोना’ काळात आपल्या मतदरार संघातील मतदारांसोबतच राज्यातील जनतेसाठी ही ‘कोरोना वॉरियर’ म्हणून धावून जाणाऱ्या, जातीपातीचे, व्यक्तिगत चरित्र हणणाचे, अपप्रचाराचे गलिच्छ राजकारण न करणाऱ्या आणि म्हणून मोदी की गॅरंटी असणाऱ्या सुधीर मूनगंटीवार यांनी या लोकसभा निवडणुकीत विकास कामांचे प्रमाण देत, शब्द देत मतदारांची मने जिंकत विजयाची गुढी उभारण्याच्या दिशेने भरारी घेतली असून कॉँग्रेस उमेदवार मात्र निरर्थक अपप्रचार रूपी मेकडाचा मोती करून खेळत बसला असल्याचे चित्र चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात पहावयास मिळत आहे.

हेही वाचा

लक्षवेधी