Monday, December 23, 2024
Homeशहरजयंत पाटलांसाठी थांबला मंत्री मंडळ विस्तार, संजय शिरसाठ यांचा गौप्यस्फोट

जयंत पाटलांसाठी थांबला मंत्री मंडळ विस्तार, संजय शिरसाठ यांचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ [पंकज किर्तीकर] :- शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे भाजप सोबत येणार असल्यानेच मंत्री मंडळ विस्तार आजपर्यंत थांबला, असा दावा शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी आज केला असून त्यांच्या या दाव्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शरद पवार गटात खळबळ उडाली आहे.

आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधतांना संजय शिरसाठ यांनी, “भाजप सोबत जाण्याचा पहिला प्रस्ताव जयंत पाटील यांनीच मांडला होता. जयंत पाटील, प्रफुल पटेल, अजित पवार यांच्यात चर्चा होऊन याबाबतची बैठक शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झाली होती. त्यानंतर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी गृहमंत्री अमित शाहा यांच्या तात्काळ भेटीसाठी अहमदाबाद गाठले होते. त्यावेळी याबाबतच्या बातम्याही प्रसार माध्यमातून आल्या असल्याचे तुम्हाला आठवत असेल. पण नंतर शरद पवार यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे अचानक भूमिका बदलली. शरद पवारांनी भूमिका बदलल्यामुळे जयंत पाटील यांचे तळ्यात-मळ्यात सुरू राहिले. अखेर काही दिवसांनी अजित पवार राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह शिंदे सरकार मध्ये सामील झाले. जयंत पाटील ही मागोमाग येतीलच असा विश्वास अजित पवारांना होता. आजही आहे. त्यामुळेच अजित पवारांनी त्यांच्या गटाचा मंत्री मंडळ विस्तार रखडवून ठेवला.” असा गौप्यस्फोट केला.

जयंत पाटील हे शरीराने शरद पवारांसोबत दिसत असले तरी ते मनाने भाजप सोबत असल्याचा दावा संजय शिरसाठ यांनी केल्याने जयंत पाटील यांच्याबाबत झडलेल्या चर्चा खऱ्या होत्या, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे.

हेही वाचा

लक्षवेधी