Monday, December 23, 2024
Homeशहरहर्सुलच्या ग्राम दैवत यात्रेत आज गौतमी पाटीलचे ठुमके

हर्सुलच्या ग्राम दैवत यात्रेत आज गौतमी पाटीलचे ठुमके

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ [प्रतिनिधी] :- शहराच्या हर्सुल भागातील [पूर्वीच्या हर्सुल गावाचे] ग्राम दैवत असलेल्या हरसिद्धी मातेच्या यात्रेला आजपासून सुरुवात होणार असून आयोजकांनी यात्रेच्या पहिल्याच दिवशी लावणी सम्राज्ञी गौतमी पाटिलच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

त्यानुसार आज सायंकाळी ६ वाजता हर्सुल परिसरातील न्यू हायस्कूल लगतच्या मैदानावर गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. यात्रेच्या प्रथेनुसार विविध समाज बांधवांकडून सकाळी ११ वाजता भंदे मिरवून हरसिद्धी मातेच्या मंदिरात रेवड्यांचा महाप्रसंद उधळला जाणार आहे. आज दि. २७ पासून सुरू होणाऱ्या या यात्रेत मोटार सायकल शर्यत, घोडा शर्यत, कुस्ती, पशू-पक्षी प्रदर्शन, हेल्याची सगर होणार आहे. यासाठी आयोजन समितीतील हरीदास हरणे, दादासाहेब औताडे, सुदाम औताडे, नारायण सुरे, पुनम बमणे आदी विशेष कार्य करत आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी