Monday, December 23, 2024
Homeशहरस्वामी समर्थ केंद्राच्या मूल्यसंस्कार मेळाव्यातून युवकांना धार्मिक संस्काराच्या पुंजिसह रोजगाराची संधी

स्वामी समर्थ केंद्राच्या मूल्यसंस्कार मेळाव्यातून युवकांना धार्मिक संस्काराच्या पुंजिसह रोजगाराची संधी

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ [प्रतिनिधी] :- शहरातील वाळूज औद्योगिक परिसरात स्वामी समर्थ केंद्रा मार्फत घेण्यात येत असलेल्या मूल्य संस्कार मेळाव्यातून युवक-युवतींसाठी धर्म संस्कार प्रबोधना सोबतच रोजगाराची संधी ही उपलब्ध करून देण्यात आली असून या अनोख्या धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास ४ हजार बेरोजगार युवक-युवतींना विविध ७० कंपन्यांत रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कळते.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामार्फत वाळूज भागात मूल्य संस्कार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जवळपास १७ एक्कर जागेवर आयोजित या मेळाव्यात धर्म संस्कार, पोथी-पुराणाचे महत्व, जीवनात आध्यात्मा चे महत्व, सनवार-व्रत-वैकल्य, मातृ-पितृ सेवा आदी धार्मिक विषयांसह आयुर्वेद, विद्यान संशोधन, सात्विक आहार, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास या विषयांवर ही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे कळते.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या मेळाव्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या धार्मिक मेळाव्यात युवकांना धार्मिक संस्काराच्या पुंजिसह रोजगाराची संधी ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध कंपन्यांकडून इथे घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यातून किमान ४ हजार बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा या अनोख्या धार्मिक मेळाव्याची सुरुवात दि. २६. रविवार रोजी झाली. गुरुपूत्र चंद्रकांत दादा, नितीन भाऊ, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते ज्ञान दालनाचे उद्घाटन करून ही सुरुवात झाली.

तत्पूर्वी स्वामी समर्थ केंद्रा पासून संदेश यात्रा काढण्यात आली. वाळूज परिसरात चार किलोमीटर अंतर कापत या संदेश यात्रेत सहभागी हजारो भाविकांनी विविध संदेश फलकांच्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधले.

हेही वाचा

लक्षवेधी