छत्रपती संभाजीनगर, दि. २७ [प्रतिनिधी] :- रविवारी रात्री शहर आणि जिल्हा परिसरात मुसळधार पाऊस झाला. रात्री ०८.०० च्या सुमारास सुरू झालेला अवकाळी पाऊस अक्षरश: शहराला झोडपून काढत असल्या सारखा रात्रभर बरसत होता. या पावसाने शहराच्या सखल भागातील अनेक घरात पाणी घुसल्याने काही कुटुंबियांचे नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले.