Monday, December 23, 2024
Homeशहरपैठण मधील विद्यार्थ्यांनी दिव्यांच्या साह्याने साकारलेल्या शिव प्रतिमेची चर्चा राज्यभर

पैठण मधील विद्यार्थ्यांनी दिव्यांच्या साह्याने साकारलेल्या शिव प्रतिमेची चर्चा राज्यभर

पैठण, दि. २७ [प्रतिनिधी] :- येथील आर्य चाणक्य विद्या मंदिर मध्ये दिवाळीच्या पूर्व संध्येला पणत्याच्या साह्याने साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजोमय प्रतिमेची चर्चा अद्याप ही थांबली नसून दिवाळी होऊन १५ दिवस होत आले तरी ही शिवाजी महाराजांच्या या नेत्रदीपक, तेजोमय प्रतिमेची चर्चा राज्यभर होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील आर्य चाणक्य विद्या मंदिर मधील शिक्षक आणि विद्यार्थी नेहमीच उल्लेखनीय असे नव-नवीन प्रयोग करत असतात. तसाच एक प्रयोग त्यांनी दिवाळीच्या पूर्व संध्येला शाळेच्या मैदानावर केला. या प्रयोगा मध्ये त्यांनी तब्बल १५ हजार दिव्यांच्या माध्यमाने शिवाजी महाराजांची भव्य, आकर्षक, तेजोमय अशी प्रतिमा साकारली. यासाठी त्यांनी १५ हजार दिव्यांसह ५४ किलो फुले आणि ४५ किलो रांगोळीचा वापर केला असल्याचे कळते.

पणत्यांच्या साह्याने साकारलेल्या या आकर्षक प्रतिमेसमोर ३५० फटाके रूपी तोफांची सलामी ही देण्यात आली. या प्रयोगाला त्यांनी ‘दिव्य शिवोत्सव’ असे नाव दिले होते.

हेही वाचा

लक्षवेधी