Sunday, December 22, 2024
Homeप्रादेशिकयशवंत विद्यालयाच्या वैभवी देवशेट्टे ची इस्कॉनच्या वतीने इस्त्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड

यशवंत विद्यालयाच्या वैभवी देवशेट्टे ची इस्कॉनच्या वतीने इस्त्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड

विनोद वट्टमवार मराठवाडा प्रतिनिधी

अहमदपूर दि.27.03.24 (इस्कॉन )आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वतीने भगवत गीतेच्या अभ्यासावर परीक्षा होऊन त्यात यशवंत विद्यालयाच्या नववी मध्ये शिक्षण घेणारी कुमारी वैभवी लक्ष्मीकांत देवशेट्टे ही सेकंड सीनियर ग्रुप मधून A1 सायकल पारितोषकास प्राप्त ठरली असून तिची इस्त्रोच्या अभ्यास दौवऱ्यासाठी निवड करण्यात आल्याचे पत्र नुकतेच शाळेला प्राप्त झालेले आहे.

या गीतेच्या परीक्षेसाठी शाळेतून 500 मुला मुलींनी स्वंयस्पूर्तिने सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व वैभवी देवशेट्टे हिचा प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पहार घालून प्रार्थनेत सत्कार करण्यात आला.

या नेत्र दीपक यशाबद्दल टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पैद्येवाढ, राम तत्तापुरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

हेही वाचा

लक्षवेधी