छत्रपती संभाजीनगर, दि. २८ [प्रतिनिधी] :- मागील काही दिवसांपासून शहरात ‘डेंग्यू’ च्या रुग्णांची संख्या वाढत आहे, याबाबीने सावध होवून शहरातील स्वामी विवेकानंद नगर, बायपास परिसरातील महिलांनी त्रिभुवनेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले.
परिसरातील त्रिभुवनेश्वर मंदिर परिसरात रोज पहाटे योग शिबीर भरते. या शिबिरास प्रामुख्याने ज्येष्ठ नांगरिकांसह महिलांची उल्लेखनीय उपस्थिती असते. योग शिबीर झाल्यानंतर परिसरातील स्वच्छते विषयी आणि डासांच्या प्रादुर्भावाविषयी होणाऱ्या चर्चेचे रूपांतर स्वच्छता अभियानात करत या महिलांनी त्रिभुवनेश्वर मंदिर परिसरातील गवत निंदून काढत संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ केल्याचे पहावयास मिळाले.