धाराशीव, दि. ११ [प्रतिनिधी] :- आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी राज्य शासनाने ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे यासाठी ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने शासन दरबारी प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनाने आपली ही मागणी मान्य करून आपल्या समाजाला न्याय द्यावा म्हणून ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती’ च्या वतीने मागील दहा वर्षांपासून आंदोलने करण्यात येत आहेत.
परंतु तरी शासन या मागणीची दखल घेत नसल्यामुळे ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने दि. ०५ मार्च २०२४ रोजी मंत्रालय, मुंबई इथे सामूहिक आत्मदहन आंदोलन ही पुकारण्यात आले होते. त्यादृष्टीने संघर्ष समिती चे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार लाभसेटवार यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष सामिती चे सचिव ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, समितीचे प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार मूत्तेपवार, संतोष उत्तरवार, गोविंद केशवशेट्टी, बालाजी पांपटवार, नरेश ऱ्याकावार, सीताराम देबडवार, मयूर मामीडवार, अनिल डूब्बेवार, संतोष फुटाने आदी पदाधिकारी मंत्रालयाकडे निघाले असतांनाच मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या मुंबई पोलिस अधिकाऱ्याच्या विशेष पथकाने त्यांना बोलार्ड इस्टेट, मुंबई येथून ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळून या विषयावर मंत्रालयात संबंधीत अधिकाऱ्याकडे बैठक झाली.
दरम्यान संघर्ष समितीचे सचिव ब्रह्मानंद चक्करवार यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून या विषयावरील बैठकीसाठी बोलावण्यात आले. तसेच आर्य वैश्य समाजाचे नेते तथा वन व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मूनगंटीवार यांनीही ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या या मागणीची, आंदोलनाची दखल घेवून हा विषय लवकरच मार्गी लावण्याचा शब्द संघर्ष समिती चे प्रदेशाध्यक्ष नंदकूमार लाभसेटवार यांना दिला. या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने लवकरात-लवकर ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे या दृष्टीने संघर्ष समितीच्या वतीने व्यूहरचना आखण्यात येत आहे.
याचाच भाग म्हणून आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ चळवळीची व्यापकता वाढविण्यासाठी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष नंदकूमार लाभसेटवार, सचिव ब्रह्मानंद चक्करवार विविध जिल्ह्यात जिल्हा कार्यकारिणीचे गठन करत आहेत. याच दृष्टीने दि. ११, मंगळवार रोजी ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या धाराशीव जिल्हा कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. यासाठी जिल्हाध्यक्ष बालाजी गुंडू केशवशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आर्य वैश्य समाज, धाराशीव च्या कार्यकारिणीची अनौपचारिक बैठक पार पडली.
या बैठकीत आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन होणे किती गरजेचे आहे, महत्वाचे आहे हे समाजबांधवांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर या विषयावर सांगोपांग चर्चा होऊन पुढील वाटचालीच्या दृष्टीने ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ ची धाराशीव जिल्हा कार्यकारिणी सर्वानुमते ठरविण्यात आली. घोषित करण्यात आली. ती पुढील प्रमाणे आहे. जिल्हाध्यक्ष : बालाजी गुंडू केशवशेट्टी, जिल्हा मार्गदर्शक : नंदकूमार नारायण मुक्कावार, जिल्हा सचिव : चंद्रकांत काशीनाथ बोराळकर, जिल्हा उपाध्यक्ष : संतोष बाबुराव माणिकवार, तुकाराम माणिकवार, कोषाध्यक्ष : राजेंद्र नागय्या केशवशेट्टी, सहसचिव : महेश माधवराव वासगी, जिल्हा संपर्कप्रमुख : बालाजी माणिकवार, जिल्हा सदस्य : सचिन व्यंकटराव केशवशेट्टी, संतोष बालाजी जवादवार.