नाशिक, दि. २६ [प्रतिनिधी] :- जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात अल्पवयीन मुलींचे लग्न लावून दिल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेप्रकरणी नांदगाव पोलिसांनी दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याचे कळते.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव तालुक्यात अल्पवयीन मुलींचे लग्न लावल्याच्या दोन घटना घडल्या. या घटनांबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या दोन्ही वेगवेगळ्या घटनांची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही घटनांमधील संशयितानविरुद्ध गुह्ये दाखल केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधीत अल्पवयीन विवाहित मुलगी लग्नानंतर गरोदर राहून ती बाळांतपणासाठी रुग्णालयात दाखल झाल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी संबंधीत मुलीच्या आई-वडिलांसह तिच्या पती व सासू-सासऱ्यासह अन्य जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झालेल्यात भगवान नाना पवार, वैशाली पवार, रविंद्र भवर, मधुकर भवर, सुमनबाई भवर यांचा समावेश आहे.