Sunday, December 22, 2024
Homeप्रादेशिकमुनगंटीवार यांच्यासाठी पंढरपूरात विठ्ठलाचा दुग्धाभिषेक

मुनगंटीवार यांच्यासाठी पंढरपूरात विठ्ठलाचा दुग्धाभिषेक

पंढरपूर, दि. २० [प्रतिनिधी] :- भाजपाचे जेष्ठ नेते तथा राज्याचे मा. वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वरील अन्याय दूर होऊन त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मुनगंटीवार समर्थकांकडून विठ्ठल-रुखमाईला दुग्धाभिषेक घालून साकडे घालण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुनगंटीवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, यासाठी राज्य भरातील मुनगंटीवार समर्थक देवतांना नवस करत आहेत, साकडे घालत आहेत. तसेच भाजप श्रेष्ठींना ईमेल, निवेदनांद्वारे विनंत्या करत आहेत. तर काही ठिकाणी आंदोलने ही होत आहेत. याचाच भाग म्हणून पंढरपूर येथील सुधीर मुनगंटीवार समर्थकांनी विठ्ठल-रुखमाईचा दुग्धाभिषेक केला. यासाठी आर्य वैश्य समाजबांधवांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत विठ्ठल-रुखमिनी मंदिरात दि. १९, गुरुवार रोजी सायंकाळी ०५.०० वाजेच्या सुमारास मुनगंटीवार समर्थक जमले.

त्यांनी विधिवत विठ्ठल-रुखमीनिचा दुग्धभिषेक करत मुनगंटीवारांना मंत्रिपद मिळावे, या अपेक्षेने विठ्ठलाला साकडे घातले. यावेळी कौस्तुभ गुंडेवार, राजेंद्र वट्टमवार, संजय कौलवार, सुरेन्द्र कवटकवार, विठ्ठल कटकमवार, राजेंद्र गुजलवार, सुलभा वट्टमवार आदी मान्यवर बंधु-भगिनींची उल्लेखनीय उपस्थिती होती.

हेही वाचा

लक्षवेधी